skip to main
|
skip to sidebar
गमतीदार प्रेम पत्र
तुझ्या डोळ्यांनी पाठवलेला ई-मेल वाचता वाचता तुझ्या प्रेमाचा प्रोग्रॅम
माझ्या हर्डडिस्कवर कधी लोड झाला मला पत्ताच नाही लागला, आता फक्त माझ्या
डोळ्यांच्या डेस्कटॉप स्क्रीनवर तुझाच चेहरा डिस्प्ले होतोय.
तुझ्याबद्दलच्या प्रेमाच्या विचारांचा प्रोग्रॅम माझ्या मेंदूच्या क्रॅश
मेमरीच्या स्टोअरिंग कॅपॅसिटीच्या बाहेर गेल्यामुळे मेंदूची प्रोसेसिंग
सिस्टीम आता हॅन्ग होऊ लागली आहे.
सख्ये ! मी तुझ्या ह्रुदयाच्या ऍड्रेसवर बऱ्याच वेळा नजरेच्या
नेट्वर्कमधून मॅपींग करायचा प्रयत्न केला. पण !! व्यर्थ !
मझ्या लाईफ सिस्टीम्ला सेव्ह करणारं आणि क्रॅश होण्यापासून वाचवणारं
प्रेमाच सॉफ्ट्वेअर फक्त तुझ्याकडे आहे.
प्रिये ! तुझं हे प्रेमाचं पॅकेज तू माझ्या ह्रुदयाच्या डिस्कवर लोड करशील ना?
तुझ्याच प्रेमात हॅंग झालेला.......
Post a Comment