मागे वळून पाहता
आले कळून आता
जीवनास अर्थ नव्हता
सखे तुझ्याविना
मानस संग आता
तुझ्या मनीची सत्यता
जगणे अशक्य माझे
सखे तुझ्या विना
काय लाविलेस आता
विरह मज देता
आनंद मज का होतो
सखे तुझ्याविना
तुला जर समजता
माझ्या मनीची व्यथा
फक्त प्रेम तुझे हवे
साऱ्या सुखाविना

Post a Comment