कुठलाही उद्योजक उद्योगधंदा करतेवळी नेहमी उद्योग मोठा कसा करता येईल याचा सातत्याने विचार करत असतो. उद्योगात नावीन्य टिकवण्यासाठी व अशा अनेक कारणांकरिता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भांडवल उभारणी आहे.छोटे व मोठे उद्योजक नेहमीच पैसा उभारणीकरिता पारंपरिक भांडवल स्रोतांचा उपयोग करत असतात. पण आता भांडवल बाजारात बरीच नवीन उपकरणे पैसा उभारण्यासाठी उपलब्ध आहेत.
1) फॅक्टरिंग : पैसा उभारणीकरिता अलीकडच्या काळात फॅक्टरिंग माध्यम प्रसिद्धीस आले आहे. या प्रकारात खेळते भांडवल उभारणीकरिता जास्त मदत होते. फॅक्टरिंगमध्ये उत्पादक उद्योजक आपले उत्पादन ग्राहकाला विकतो. जर ग्राहकांकडून पैसा मिळण्यास विलंब होत असेल तर उत्पादक आपल्याला मिळणा-या पैशाची बिले फॅक्टरकडे देतात. त्याच्या मोबदल्यात फॅक्टर विक्रेता-उत्पादकाला ताबडतोब पैसा देतात. आणि ग्राहकाकडून येणारा पैसा थेट फॅक्टरीकडे जमा होतो.
2) प्रायव्हेट इक्विटी : वेगवेगळ्या आर्थिक संस्था कंपन्यांमध्ये समभाग घेण्यासाठी पैसा बाजारात ओतत असतात. प्रायव्हेट इक्विटी गुंतवणुकीच्या माध्यमातून खासगी वित्तीय संस्था त्यांच्या विश्लेषणावरून भवितव्य उत्तम असणा-या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असतात. त्याच्या मोबदल्यात आर्थिक संस्था कंपन्यांमध्ये समभाग घेतात. त्यांना नफ्यामध्ये गुंतवणुकीच्या प्रमाणात लाभांश मिळतो आणि काही वेळेस गुंतवणुकीवर निश्चित परतावासुद्धा कंपन्या देत असतात.
3) लीझिंग फायनान्स : लीझिंग फायनान्समध्ये लीझिंग कंपन्या (लेसर) उद्योजकाकडून उपकरणे विकत घेतात व त्यांना भांडवल पुरवतात. लीझिंग कंपनी घेतलेली उपकरणे गरज उद्योजकांना भाडेतत्त्वावर देत असतात. या माध्यमातून लीझिंग कंपनी उद्योजकांना भाडेतत्त्वावर देत असतात. या माध्यमातून लीझिंग कंपनी उद्योजकांना पैसा तसेच उपकरणे दोन्ही वापरासाठी उपलब्ध करून देतात.
4) एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोइंग : या माध्यमातून कंपन्या परदेशातील बँकांमधून कर्ज घेतात. सरकारने प्रत्येक क्षेत्रातील उद्योगांना विशिष्ट मर्यादेपर्यंत परदेशातून पैसा उभारणीचे अधिकार दिले. आहेत. या भांडवल उभारणी साधनांचा उपयोग मोठे उद्योजक करतात. जर का बाहेरील देशातून मिळणा-या भांडवलावरील व्याजदर आपल्या देशातील व्याजदरापेक्षा स्वस्त आणि कमी असतील तर या आव्हानाचा उपयोग करणे उद्योजकांकरिता रास्त ठरते.
5) डिबेंचर : डिबेंचर किंवा कॉर्पोरेट बाँडच्या माध्यमातून उद्योजक बाजारातून पैसा उभारू शकतात. भारतात पैसा उभारणीकरिता छोट्या उद्योजकांनी या साधनांचा वापर खूप प्रमाणात करायला पाहिजे. या माध्यमातून उद्योजक बाँडधारकांना पैसे दिल्याबद्दल व्याजासहित पैसे विशिष्ट कालावधीत परत करण्याची शाश्वती देतात.
6) बँक : काळापासून चालत आलेले सर्वात भरवशाचे भांडवल उभारणी साधन म्हणजे बँक फायनान्स आहे. बँकेकडून कर्ज घेऊन व्याजासहित दिलेल्या कालावधीत ते परत करणे ही प्रक्रिया सामान्य माणसांकडून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे.
7) आयपीओ : इनिशियल पब्लिक ऑफरिंग किंवा आयपीओच्या माध्यमातून कंपन्या आपल्या समभागांची विक्री शेअर बाजारात करतात. पैसा उभारणीचा हा मार्ग आहे. लघु व मध्यम उद्योजक मोठ्या उद्योजकांप्रमाणे या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सामील व्हावे याकरिता भारतात आता एसएमई एक्स्चेंजची सुरुवात झाली आहे. समभागधारकांना पैशाच्या मोबदल्यात लाभांश देणे किंवा समभागाची विभागणी करून अधिक समभाग देणे हे कंपन्यांचे कर्तव्य असते.
8) लेटर ऑफ क्रेडिट : आयात-निर्यात उद्योजकांना परदेशातील व्यक्तीसोबत व्यवहार करावा लागत असतो. त्याकरिता त्यांना पैसे मिळण्याची, शाश्वतीची चिंता असते. लेटर ऑफ क्रेडिटमध्ये उद्योजक बँकेकडे पैसा उभारणीकरिता अर्ज करतात. म्हणजे निर्यातदार आपल्या बँकेकडे ग्राहकांच्या बँकेचे पत्र देतात. त्यामुळे बँकेला पैसे मिळण्याची शाश्वती मिळते व उद्योजकाला खेळते भांडवल उपलब्ध होते. अशा विविध भांडवल उभारणी साधनांचा उपयोग उद्योजकांनी केला पाहिजे व स्वत:च्या उद्योगांचा विस्तार केला पाहिजे.
(लेखक स्ट्रँटमॅन कन्सल्टन्सी सर्ब्हिसेसचे संचालक आहेत)

Post a Comment