skip to main
|
skip to sidebar
वृद्धाश्रम- BY Mohan Badge

समुद्र किनाऱ्यावर छोटे बहिण भाऊ वाळूचं घर बनवण्यात मग्न होते...
" थांब दादा असं नाही...... इथे आपण गाडी ठेवायची. " त्यांचा खेळ कल्पना पाहताना त्यांच्या आईला फार बर वाटत होत.
" आई बघ हं, ही रूम माझी, ही ताई ची, आणि ही तुझी. किती छान आहे ना आपलं घर? " आपण बनवलेलं घर आपल्या आईला कौतुकाने दाखवत मुलगा म्हणाला.
इतक्यात त्याचे बाबा मुलांसाठी आईस क्रीम घेऊन आले, आणि विचारलं " आणि माझी रूम रे? मी कुठे राहायचं? "
निरागसपणे त्या छोट्या जीवांनी उत्तर दिलं, " बाबा तुम्हाला कशाला हवीये रूम? तुम्ही कसं आजोबांना वृद्धाश्रमात पाठवलंत, आम्ही पण तुम्हाला पाठवणार. बाबा म्हातारे झाले कि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात ना? "
हे ऐकून त्या बापाला आपल्या केलेल्या कर्माची फळ दिसू लागली....................
विचार चक्र जोरात फिरू लागलं....... ' हे आपण काय शिकवलं?'
विचार चक्राची गती वाढत गेली आणि तो बाप चक्कर येऊन तिथेच थंड पडला.
.
.
विचार करा...... आपण जसे वागतो त्याचेच अनुकरण करत आपली पुढची पिढी घडतेय.
कर्म प्रमाणे फळ मिळतंय....... सावधान व्हा!
युगान युगे चालत आलेल्या तीन आश्रमा नंतर चा हा मनुष्याने कलियुगात शोधून काढलेला चौथा आश्रम.....' वृद्धाश्रम'.
कुठे तरी आपण सावध झालंच पाहिजे.........
Rty
ReplyDelete