शब्द आग,शब्द धार
शब्द शब्द गीत होती
शब्दाच्या डोहात मग
कविता ही दाटून येती...
शामरंगी शब्द होती
मोरपंखी शब्द होती
मनास अलगद स्पर्शुनी
शब्द मग भरारती ...
शब्द वेदनेचा आगडोंब
शब्द मनातला हिरवा कोंब
शब्द सुवर्णाची खाण
शब्द दोन जीवांची आण...
शब्द शब्द वेचताना
निशब्दता दाटून येते
शब्दांच्या शब्दच्छ्लात
आर्तता मग साद देते ...
मन रिझविण्या शब्द येती
घायाळ ही शब्दच करती
वाक् वाहन वैखरीच्या चरणी
शब्दांच्याच मौतिक राशी ...
Post a Comment