धोंड्याचा महिना, जावई खूश होईना
महाराष्ट्रात धोंड्याच्या महिन्याला विशेष महत्त्व आहे. धोंड्याचा महिना हा दर तीन वर्षांनी येतो. हा महिना जावयांसाठी पर्वणीच असते. या निमित्ताने जावयांचे आदरातिथ्य सुरू असते. जावयाला खूश करण्यासाठी सासरकडील मंडळींकडून सोन्याच्या रूपात दान करण्याची परंपरा चालत आलेली आहे. ज्याच्या त्याच्या आर्थिक कुवतीप्रमाणे जावयाचे आदरातिथ्य केले जाते. ज्यांचे नवीन लग्न झाले आहे व सोन्याचे दागिने करून खूश केले जाते. धोंड्याच्या महिन्यादरम्यान सोने बत्तीस हजार प्रतितोळा पोहोचले तर कापडाच्या दरातही २0 टक्क्यांनी वाढ झाली. त्यातच पावसाने पाठ फिरविल्याने ग्रामीण भाग पुरता उजाड बनला आहे. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यावर दुष्काळाचे मोठे सावट आहे.

Post a Comment