मालवेअर व्हायरसमुळे भीती

मलवार व्हायरस
संगणकातील डीएनएस बदलून त्यातील सर्व माहिती हस्तगत करणे आणि ती माहिती सायबर विश्वात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांना पाठविण्याचे काम ‘मालवेअर’च्या साह्याने केले जाते.
अमेरिकी गुप्तचर यंत्रणा एफबीआयने २००७ सालीच या वायरसचा छडा लावला होता. एफबीआयने आपल्या सर्व्हरच्या साह्याने या व्हायरसपासून जगभरातील इंटरनेट संरक्षण केले होते. मात्र सोमवारपासून एफबीआय ही सेवा बंद करणार असल्याने सामान्य इंटरनेटधारकांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
या व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. मात्र अमेरिकेप्रमाणेच इटली, जर्मनी, भारत ब्रिटन, कॅनडा फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील संगणकही या व्हायरसच्या रडारवर आहेत.
Post a Comment