यारी-दोस्ती-मोबाईल-मिसकॉल.
‘मार ना माझं रिचार्ज, मार ना यार. एवढं पण नाही का दोस्तीखातर.? मार ना यार. मार ना.!’
- ही कसली ‘मारामारी’.?
ही मारामारी नाही, यारी-दोस्तीच्या नव्या भाषेत ही मैत्रीची नवी परिभाषा आहे. अडल्या-नडल्या, संपल्या बॅलन्सला जो छोटा का होईना रिचार्ज तत्क्षणी मारायला तयार होतो तो खरा मित्र किंवा मैत्रीण. आणि ‘माझा बॅलन्स संपलाय, रिचार्जला पैसेच नाही’ असं ज्याला सांगावंही लागत नाही, न सांगता परस्पर तो दहा-वीस रुपयांचा का होईना रिचार्ज मारून मोकळा होतो तो खरा जिगरी यार, जिवाला जीव देणारा दोस्त.
पण मिळतात कुठं असे मित्रमैत्रिणी.? एखादी असेल खास मैत्रीण तर किंवा तसा ‘खास’ मित्र तर तो धावतो अशा आणीबाणीत, पण बाकीचे सारे ‘कमिने’ दोस्त. ते आपल्या फोनवरून याला त्याला ब्लू टूथवरून गाणी पाठवतील, हक्कानं देत बसतील मिस कॉल, पण कर रे जरा रिचार्ज म्हटलं की लागलेच रडायला. त्यांचे पूज्य पिताजी लगेच आटवून टाकतात त्यांची गंगाजळी. पण मोबाईलचं ‘आउटगोइंग’च बंद झालं तर उपयोग काय त्याचा.? निदान मिस कॉल पुरता तरी हवाच ना बॅलन्स.
मग कराव्या लागतात गयावया. कधी ‘मार रे रिचार्ज’ म्हणत इमोशनल ब्लॅकमेल तरी करावं लागतं, नाही तर कुणाच्या तरी इमोशनल ब्लॅकमेलला बळी तरी पडावंच लागतं. एकमेकींना शिव्या देत का होईना पण भागवली जाते निकड. कारण आज त्याच्यावर वेळ आहे उद्या आपल्यावर, ‘नाही करत रिचार्ज’ म्हणून सांगणार कुणाला.?
त्यातल्या त्यात काही मुलींचं काम सोपं होतं, जरा रडून दाखवलं ग्रुपमध्ये की ‘एखादा’ तरी पाघळतोच, करतो पाचपन्नास रुपयांचं रिचार्ज. ती खूश, मैत्रीचा राजमार्ग खुला.!
यारी-दोस्ती-मोबाईल-मिसकॉल.
कॉलेजलाइफ का नया मंत्रा है.!

Post a Comment