skip to main
|
skip to sidebar
नक्कीच केला असणार...

आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी यापैकी एकतरी "उद्योग" नक्कीच
केला असणार...
१. आपल्या शर्टच्या / फ्रॉकच्या बाहीला नाक पुसणे...
... २. त्या लहानश्या पिवळ्या फुलपाखराला पकडण्याचा प्रयत्न करणे...
३. पाटीवरच्या पेन्सीलचे किंवा खडूचे तुकडे खाणे... ...
४. आई गहू साफ करत असतांना त्यातले मातीचे खडे खाणे...
५. रात्री चमचमणाऱ्या काजव्याला पकडून माचीस च्या डब्बित बंद करून ठेवणे...
६. पावसाळ्यात निघणाऱ्या पैसा नामक जीवाला माचीस च्या डब्बित बंद करून ठेवणे (तसं केल्याने त्याचं रुपांतर २५ पैश्याच्या नाण्यात होतं असा तेंव्हा समज असायचा) ...
७. मुंगळ्याला हातात पकडण्याचा प्रयत्न करणे...
८. गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे अन मास्तरच्या छडीच्या भीतीने, शाळेत न जाण्यासाठी, उगाच डोकं किंवा पोटदुखीच नाटक करणे...
९. आपल्या वहीत मोराचं पीस / पिंपळाच पान ठेवणे...
[अजून गमतीदार फोटो बघण्यासाठी संकेत स्तलावर लॉग इन करा ........ www.assalmarathisms.blogspot.com]
१०. कुठे धडपडल्यावर, जर कुणी बघत नसेल तर गुपचूप उठून कपडे झटकून घेणे आणि जर कुणी बघत असेल तर यथेछ भोकाड पसरणे...
!! आता तुम्ही सांगा कि या पैकी तुम्ही कोणता उद्योग केला आहे
पण नक्की सांगा कारण तुम्ही पण लहान होताच ना ?????
Post a Comment