skip to main
|
skip to sidebar
देवळाच्या मागे ये
एक छोटा मुलगा एका चित्रपटात पाहतो की, त्यातल्या एका लहान मुलाला काही गुंड पळवून नेतात आणि त्याच्या आई-वडिलांना पैसे मागतात. मग आई-वडील पैसे देऊन आपल्या मुलाची सुटका करून घेतात.
हा पण मग अशीच भन्नाट युक्ती वापरुन सायकल मिळवायची असं ठरवतो.
तो शंकराच्या देवळात जातो आणि प्रार्थना करतो, "हे महादेवा, मला एक सायकल दे."
तो १ दिवस वाट पाहतो, पण सायकल काही मिळत नाही. मग दुसर्या दिवशी पुन्हा देवळात जातो.
आता मात्र तो देवळातली गणपतीची मूर्ती उचलून घेऊन घरी येतो.
देवळातून बाहेर पडण्यापूर्वी मात्र तो एक चिठ्ठी शंकराच्या पुढे ठेवून येतो.
ती अशी...
"जर तुला तुझा मुलगा सुरक्षित हवा असेल, तर उद्या सायकल घेऊन देवळाच्या मागे ये."
Post a Comment