आठवणी फार गोजिरवाण्या असतात,
सतत भिरभिरणाऱ्या मनाला स्पर्श करून जातात,
आठवणी फार लबाड असतात भिरभिरणाऱ्या मनाला त्या ओढ लावतात,
आठवणी या अशाच असतात,
काहीही न करून भरपूर काही करून जातात,
आठवणी फक्त आठवणीच असतात,
त्या आपल्या स्पर्शाने जुन्या गोष्टी टवटवीत करतात,
आणि........... शेवटी
हृदयाच्या कप्प्यातील एक हिस्सा बनून राहतात,...............
Post a Comment