तू कोण माझ्यासाठी..!
तू कोण माझ्यासाठी..!
तू
सागर अथांग
नक्षत्रांची रांग
की श्वासातली आग .
मला कधीतरी सांग..!
तू
शांत दरवळ
धुंद परिमळ
की वाळूत एकाकी
सांडलेले मृगजळ..!
तू
राधेची आर्तता,
मीरेची तन्मयता
की मला भिजवाया
सप्तस्वरांची सरिता..!
तू
क्षितिजापाशी
दिसलीस मघाशी
की मुशाफ़ीर मेघ
भिरभिरता आकाशी..!
तू
वळवाची सर
प्राजक्ताचा बहर
की दंव पहाटेचे
ओघळते पानावर..!
तू
स्वप्नांचा आवेग
की चांदण्याची मिठी .
मला कधीतरी सांग ,
तू कोण माझ्यासाठी..!
तू कोण माझ्यासाठी..!
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment