आले भेटाया मी ,तुझी लाडकी, सख्यारे
ओठात तुझी गिते,देहात मदन वारे
आले भेटाया मी ,तुझी लाडकी, सख्यारे
तनु रंगली, रंग पेट्ल्या गुलमोहोरचे
उधळत आले रे, सडे रसगंधाचें
रक्त कण कण तुझेच रे, नांव पुकारे
आले भेटाया मी,तुझी लाडकी, सख्यारे
आठवणींचे देहात, लक्ष सागर उसळले
आठवता छबि तुझी, नाजुक तनु उन्मळे
तोडली बंधने सारी, चुकविले पहारे
आले भेटाया मी,तुझी लाडकी सख्यारे
रोम रोमात उठले सख्या,प्रितिचे काहुर,
नाहिस अवती भवती तु, लागे हुरहुर
शोधता तुला, मीच हरवुन बसले रे
आले भेटाया मी,तुझी लाडकी सख्यारे
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment