Assal Marathi Ukhane,Marathi Kavita,Jokes,Marathi News,Marathi Fun,Marathi Video Songs,Marathi Mp3,marathi testimonials for orkut,
आजच्याच दिवशी म्हणजे ९ मे १५४० ला 'महाराणा प्रतापसिंग' यांचा जन्म झाला.
भारतीय इतिहासात प्रात:स्मरणीय अशा महाराणा प्रतापसिंहाचे नाव राष्ट्र, धर्म, संस्कृति, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांचे प्राणपणाने रक्षण करणार्या शूरवीरांच्या परंपरेत सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे.
भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंहाचे नाव नेहमीच साहस,शौर्य,त्याग,आणि हौतात्म्य यासाठी प्रेरणादायक ठरले. मेवाडच्या सिसोदिया घराण्यात राणा हमीर, बाप्पा रावळ, राणा संग असे अनेक शूरवीर हून गेले. या सर्व वीरांना ‘राणा’ असे संबोधिल्या जाते. पण प्रतापसिंहाला ” महाराणा ” ही उपाधी मिळाली आहे.
महाराणा प्रतापसिंहांच्या काळात दिल्लीच्या सिंहासनावर मोगल बादशहा अकबराची सत्ता होती. तो हिंदूंच्या बळाचा वापर करून हिंदु राजांनाच गुलाम बनवत असे. अश्यात महाराणा प्रतापसिंहांनी स्वातंत्र्यासाठी सतत २५ वर्षे लढा दिला.
`स्वातंत्र्य’ या शब्दाचा पर्यायच `महाराणा प्रतापसिंह’ व्हावा इतके त्याचे जीवन तेजस्वी होते. त्यांच्या वीरस्मृतीस अभिवादन _/\_

Post a Comment