अभिनेते आनंद अभ्यंकर यांचं अपघाती निधन
लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर यांचं आज पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघाती निधन झालं आहे. उर्से टोल नाक्याजवळ अभ्यंकर यांच्या वॅगनआर गाडीला हा अपघात झाला.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पांनं अभ्यंकर याच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांच्याबरोबर असणारा उदयोन्मुख अभिनेता अक्षय पेंडसे याचाही मृत्यु झाला आहे.
अक्षय पेंडसेच्या दोन वर्षांच्या मुलगा या अपघातात दगावला. तर आणखी दोघेजण जखमी झालेत.
आनंद अभ्यंकरांनी मोठ्या आणि छोट्या पडद्यावर त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या.
वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होते. त्याचबरोबर सध्या 'झी मराठीवर'च्या 'मला सासू हवी' या मालिकेतही अक्षय पेंडसे आणि आनंद अभ्यंकर एकत्र काम करत होते.
तसेच अक्षयने 'मिस्टर नामदेव म्हणे' या नाटकात आणि 'उत्तरायण' चित्रपटात भूमिका केली होती. काही वर्षांपूर्वी भक्ति बर्वे-इनामदार यांचाही मुंबई-पुणे हायवेवर अपघाती मृत्यु झाला होता.

Post a Comment