skip to main
|
skip to sidebar
तुझा फोटो सुद्धा माझाच होता
काल जोरात पाउस पडला
दोन थेंब तुझ्यावर पडले आणि दोन माझ्यावर
आता असे विचारू नका कि,
"इतका मोठा पाउस पडला,
मग दोनच थेंब कसे पडले?"
...कविता आहे यार समजून घ्या.......
तर कुठे होते मी?
हा,आठवले
"काल जोरात पाउस पडला
दोन थेंब तुझ्यावर पडले आणि दोन माझ्यावर,
तुझ्या वर पडलेल्या त्या दोन थेंबांचा मला राग आला
माझ्या परवानगी शिवाय त्यांनी स्पर्श केलाच कसा तुला?
पण काय करणार?दोष तरी कोणाला देणार ?
ते थेंब पण माझे होते
आणि
त्या थेम्बानी भिजलेला हातातला तुझा फोटो सुद्धा माझाच होता."
Post a Comment