प्रिय
लव्ह लेटर पाठवण्यास कारण, की मला
तू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.
म्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला
आवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.
तू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं
मंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई
सोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.
शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल
वाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.
आणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि
सोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला
नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.
सरांना देऊ नकोस.
तुझा प्रियकर
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment