चार भिंती उभ्या केल्या
म्हणजे त्याला तुम्ही घर म्हणता का,
माणुसकी शून्य जीवन,
याला आपण मैत्री म्हणता का,
मोकळे केस, तोकडे कपडे घातले,
म्हणून तुम्ही त्याला फ्याशन म्हणता का,
उभे राहून बफे जेवता राव तुम्ही,
त्याला पारंपारिक जेवण म्हणता का,
इथे जगणे अवघड जगवणेही अवघड,
याला आपण जीवन म्हणता का,
पाश्चिमात्यांचे लागले डोहाळे,
आपली संस्कृती त्यास म्हणता का,
@ सुरेश पाठे पाटील
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment