मी कुठेतरी वाचलं
मी कुठेतरी वाचलं
आनंद दिला की
आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला
की जिवनाचा खरा अर्थ कळतो
मी आनंद दिला पण
मला आनंद मिळाला नाही,
जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं
आपण आपल्या प्रेमाला
जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं
नाही आलं तर ते आपलं नव्हतंच
मी माझं प्रेम मुक्त सोडलं
पण ते परत आलंच नाही,
मला कधी कोणी माझं वाटलंच नाही
आता मी वाचणं सोडलं
पण जगणं सोडलं नाही
आनंद देणं सोडलं नाही
प्रेम करणं सोडलं नाही
आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment