मन म्हणजे........
वेड
भरकटलेल
मर्यादा नसलेल
कुठल्याही थराला विचार करणार!!
माझ मनही तसच.....
सुखाचा क्षणात असताना
अचानक दु:खात कोसळणार
स्वप्नांचा डोलाऱ्यावर
नवीन विश्व बांधणार
आणि ......... एखाद्या वादलामुळे
अचानक कोलमडून पडणार!!
भावनांना वाव देणार
पण कधी कधी त्यानांही ठेच पोहचवणार
सैरावैरा पळणार
आणि पुन्हा एखाद्या अडथल्यामुळे पडणार
मायेला आसुसलेल
पण प्रत्येक वेळी ठेचकळणार!!
माझ मन म्हणजे.....
वेड्या भावनांचा वेडा खेळ
खुळ्या शब्दांचा न घालता आलेला मेळ
मला कधीही न उमगलेल
आणि ......... इतराणही कधी न समजून घेतलेल
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment