माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....
दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....
तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....
एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही
मी कविता करायला का शिकलो?
कारण आयुष्यात, नेहमीच मी फसलो
कधी प्रवासाची वाटंच चुकलो
मग तिथेच थांबून, खूप रडलो
कधी एका दुःखातून, कसातरी सावरलो
लगेच दुसर्या दुःखात मी अडकलो
उगाच वाटे, मी यातून निसटलो
क्षणात लक्षात येई, ईथे मी चुकलो
बर्याच्वेळा आयुष्यात, मी ठेचकाळुन पडलो
दरवेळेस मी तेव्हा, नव्या जोमाने उठलो
माझ्याच चुकांमुळे, आपले गमावून बसलो
शेवटी या निरस आयुष्यावर, खुप-खुप हसलो
हसुनसुद्धा सारखं, मी फार थकलो
म्हणून चुकून मी, कविता करायला शिकलो. . . .
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment